Ad will apear here
Next
‘अवास्तव अपेक्षेच्या रेसमध्ये धावू नका’
पुणे : ‘न संपणारी जीवघेणी स्पर्धा आणि सततची तुलना मानवाला घातक आहे. भौतिक गोष्टींबद्दलचा हव्यास  आणि असमाधान यांच्यामुळे माणूस आपले मन:स्वास्थ हरवून बसला आहे. सततची स्पर्धा, अवास्तव अपेक्षा या रेसमध्ये सध्या लोक धावत आहेत; पण या रेसमध्ये धावू नका. यातून काहीच सकारात्मक निर्माण होणार नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने जगायला शिका,’ असे विचार अच्युत गोडबोले यांनी मांडले. निमित्त होते वाचन जागर महोत्सवाच्या निमित्ताने अक्षरधारा बुक गॅलरी आयोजित ‘मनक्ल्लोळ – मनोविकारांचा मागोवा’ या कार्यक्रमाचे.

या वेळी मिलिंद खाडे यांनी अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी यांच्याशी संवाद साधला. या वेळी गोडबोले म्हणाले, ‘सध्या लोक स्वत:च्या मनापेक्षा लोकांना काय वाटेल, याचाच जास्त विचार करतात. लोकांच्या मताला अवाजवी महत्त्व दिल्यामुळे आपण ‘सेल्फ इमेज’ (स्वप्रतिमा) आणि ‘सेल्फ एस्टिम’ (स्वाभिमान) या गोष्टी गमावून बसतो.’

न्यूनगंडाविषयी बोलताना गोडबोले म्हणाले, ‘एरिक फ्रॉमनने न्यूनगंडाविषयी सुंदर व्याख्या केली आहे ती अशी, की न्युनगंड म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नाही असं वाटणं नसून, न्यूनगंड म्हणजे आपल्याला असं वाटणं की इतरांना असं वाटतं, की आपल्याला ती गोष्ट येत नाही.’

हल्ली सोशल मीडियामुळे निर्माण होत असलेल्या मनोविकृतींवर भाष्य करताना काही नीलांबरी जोशी यांनी हृदययद्रावक घटनासुद्धा सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘हल्ली सतत सेल्फी काढणं, पाच पाच मिनिटाला फेसबुक व व्हॉट्सअॅपवरील अपडेट चेक करणं, ‘ब्लू व्हेल’सारख्या गेम्समुळे होत असलेल्या आत्महत्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमुळे मनोविकारांचा नव्याने मागोवा घेण्याची गरज वाटते आहे.’

मनोविकार कसे ओळखावेत व त्यावर कशी मात करावी, याविषयी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी वाचकांना मार्गदर्शन केले. ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर व ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. मुकेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZUGBF
Similar Posts
‘ऐसी अक्षरे’तर्फे कलावंतांच्या साहित्यावर विशेषांकाचे प्रकाशन पुणे : ‘बेलवलकर हाउसिंगच्या ‘ऐसी अक्षरे’ या नियतकालिकातर्फे नाट्य व चित्रपट सृष्टीतील कलावंतांच्या साहित्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन शनिवार, २८ सप्टेंबर २०१९ रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ऐसी अक्षरे शब्द रूपेरी असे या कार्यक्रमाचे नाव असून, ज्येष्ठ साहित्यिक व लेखक अच्युत
मनोविकास प्रकाशनतर्फे २९ जूनला चर्चासत्राचे आयोजन पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली
प्रकाशक, वितरक, विक्रेते यांच्या पुढाकाराने पुण्यात ‘वाचन जागर’ पुणे : लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील काही लेखक, प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते यांनी एकत्र येऊन ‘वाचन जागर अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून, पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता एकाच वेळी आठ ठिकाणी या अभियानाचे उद्घाटन होणार आहे
‘केवळ ‘जीडीपी’ वाढायला हवा असे म्हणणे मूर्खपणाचे’ पुणे : संपूर्ण देशातील उत्पादनाचे अंतिम मूल्य म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी); मात्र यात विषमतेचा विचारच होताना दिसत नाही. जीडीपी वाढला, तर रोजगार वाढेल परिस्थिती सुधारेल हे साफ खोटे ठरत असून, आजही ६० ते ७० टक्के जनता ही दहा हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक शुल्कात आपला परिवार चालवते. दहा टक्के जीडीपी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language